Moong Kachori - मुगाची कचोरी

साहित्य :- दिड वाटी मुगाची डाळ (बिना सालीची), एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा बडीशोप, अर्धा टे.स्पुन गरम मसाला, अर्धा किलो मैदा, तळायला तेल आणि चवीनुसार मीठ. कृती :- २ तास मुगाची डाळ भिजत ठेवा. नंतर पाणी काढून थोडी डाळ, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, जिरेपुड, बडीशोप, गरम मसाला मिक्सर मधून फाईन पेस्ट करा आणि बाजूला काढून घ्या. नंतर उरलेली मुगाची डाळ थोडी मिक्सर मधून जाडसर अशी काढून घ्या. नंतर एका नॉनस्टिक कढईत तेल घालून हे सर्व मिश्रण परतवा आणि वाफवून घ्या. गैस बंद करून थंड व्हायला ठेवा. हे आपले कचोरी मधील स्टफिंग तयार झाले. परातीत मैदा, दिड पळी तेल, चवीनुसार मीठ घालून थोडे घट्ट भिजवा. खुप एकजीव भिजवू नका, नाहीतर पापुद्रे सुटणार नाही. १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर एक सारखे गोळे करा, पुरी सारखे लाटा. त्यात सारण भरून बंद करा आणि हलक्या हाताने कचोरीच्या येवढा आकार द्या अथवा हलके लाटून घ्या. सर्व कचोरी तयार झाली की कढईत तेल गरम करून मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईल अशी तळून घ्या. वीस-बावीस कचोरी होतात.