Posts

Showing posts from September, 2020

Moong Kachori - मुगाची कचोरी

Image
साहित्य :- दिड वाटी मुगाची डाळ (बिना सालीची), एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा बडीशोप, अर्धा टे.स्पुन गरम मसाला, अर्धा किलो मैदा, तळायला तेल आणि चवीनुसार मीठ. कृती :- २ तास मुगाची डाळ भिजत ठेवा. नंतर पाणी काढून थोडी डाळ, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, जिरेपुड, बडीशोप, गरम मसाला मिक्सर मधून फाईन पेस्ट करा आणि बाजूला काढून घ्या. नंतर उरलेली मुगाची डाळ थोडी मिक्सर मधून जाडसर अशी काढून घ्या.  नंतर एका नॉनस्टिक कढईत तेल घालून हे सर्व मिश्रण परतवा आणि वाफवून घ्या. गैस बंद करून थंड व्हायला ठेवा. हे आपले कचोरी मधील स्टफिंग तयार झाले. परातीत मैदा, दिड पळी तेल, चवीनुसार मीठ घालून थोडे घट्ट भिजवा. खुप एकजीव भिजवू नका, नाहीतर पापुद्रे सुटणार नाही. १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर एक सारखे गोळे करा, पुरी सारखे लाटा. त्यात सारण भरून बंद करा आणि हलक्या हाताने कचोरीच्या येवढा आकार द्या अथवा हलके लाटून घ्या.  सर्व कचोरी तयार झाली की कढईत तेल गरम करून मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईल अशी तळून घ्या.   वीस-बावीस कचोरी होतात.

Ukadpendi - उकडपेंडी

Image
  चार जणांसाठी साहित्य :- २ वाटी कणीक, १ मोठा कांदा, २ टी.स्पुन तिखट किंवा मिरच्या, अर्धा टी.स्पुन हळद, अर्धा टी.स्पुन सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू, १ टी.स्पुन साखर, चवीनुसार मीठ, फोडणी ला २ पळी तेल, हिंग, मोहरी-जिरे, कढीपत्ता. कृती :- कढईत सर्वप्रथम कणीक मंद आचेवर खमंग भाजून घ्यावी. नंतर ताटात काढून घ्या आणि दुसऱ्या कढईत तेल गरम करायला ठेवावे. त्यात हिंग-मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि कढीपत्ता, जिरे, मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यात हळद घालावी, मिरच्या घातल्या नसल्या तर तिखट घाला. मग सायट्रिक ॲसिड, साखर व चवीनुसार मीठ घाला. नंतर भाजलेली कणीक घाला. दोन मिनिटं मंद आचेवर सर्व परतून घ्या आणि त्यावर पाण्याचे हबके मारत हलवा. खूप पाणी घालु नका. उकडपेंडी मऊ होईपर्यंत पाणी शिंपडत हलवावे. कुठेही कोरडी राहता कामा नये. नंतर ताट ठेवून वाफ आणावी. सर्व मंद आचेवर करावे. लहान मुलांसाठी उत्तम नाश्ता आहे. गरमगरम सर्व करा आवडीनुसार ओले खोबरे-कोथिंबीर किंवा बारीक शेव घालून गार्निश करा आणि जर सायट्रिकॲसिड घातले नसेल तर लिंबू घ्या. मी लिंबूच सजेस्ट करेल. तर नक्की Try करा.