Ukadpendi - उकडपेंडी

 


चार जणांसाठी

साहित्य :- २ वाटी कणीक, १ मोठा कांदा, २ टी.स्पुन तिखट किंवा मिरच्या, अर्धा टी.स्पुन हळद, अर्धा टी.स्पुन सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू, १ टी.स्पुन साखर, चवीनुसार मीठ, फोडणी ला २ पळी तेल, हिंग, मोहरी-जिरे, कढीपत्ता.



कृती :- कढईत सर्वप्रथम कणीक मंद आचेवर खमंग भाजून घ्यावी. नंतर ताटात काढून घ्या आणि दुसऱ्या कढईत तेल गरम करायला ठेवावे. त्यात हिंग-मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि कढीपत्ता, जिरे, मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यात हळद घालावी, मिरच्या घातल्या नसल्या तर तिखट घाला. मग सायट्रिक ॲसिड, साखर व चवीनुसार मीठ घाला. नंतर भाजलेली कणीक घाला. दोन मिनिटं मंद आचेवर सर्व परतून घ्या आणि त्यावर पाण्याचे हबके मारत हलवा. खूप पाणी घालु नका. उकडपेंडी मऊ होईपर्यंत पाणी शिंपडत हलवावे. कुठेही कोरडी राहता कामा नये. नंतर ताट ठेवून वाफ आणावी. सर्व मंद आचेवर करावे.

लहान मुलांसाठी उत्तम नाश्ता आहे. गरमगरम सर्व करा आवडीनुसार ओले खोबरे-कोथिंबीर किंवा बारीक शेव घालून गार्निश करा आणि जर सायट्रिकॲसिड घातले नसेल तर लिंबू घ्या. मी लिंबूच सजेस्ट करेल.

तर नक्की Try करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट द्यायला विसरू नका.

अनघा लिखिते

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Sanja - सांजा

Indian Healthy and tasty breakfast recipes

Upma/Upitt