Sanja - सांजा

 


साहित्य :-

👉 अडीच वाटी बारीक रवा

👉 दोन मध्यम आकाराचे बारीक कांदे (बारीक चिरलेला)

👉 ५-६ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेली)

👉 पाऊण वाटी तेल

👉 ७-८ कढीपत्त्याची पाने

👉 एक टेबल स्पुन उडीद डाळ धुवून पाच मिनिटे भिजवून ठेवा

👉 एक टी स्पुन मोहरी, चिमूटभर हिंग

👉 अर्धा टी स्पुन हळद

👉 एक टेबल स्पुन साखर

👉 चवीनुसार मीठ

👉 ४ - ५ वाटी पाणी

गार्निशींग साठी :-

काजू / कोथिंबीर / ओल्या खोबऱ्याचा किस / लिंबू

कृती :-

सर्वप्रथम रवा खमंग भाजून घ्या आणि ताटात काढून घ्या. नंतर कढईत तेल घाला, गरम झाल्यावर हिंग-मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर, उडीद डाळ, कढीपत्ता, कांदा आणि मिरच्यांचे तुकडे या क्रमानुसार.

कांदा गुलाबी झाल्यावर हळद घाला, थोडे परतवा. नंतर पाणी घाला, मग साखर टाका आणि उकळी फुटू द्या.


नंतर त्यात मीठ आणि भाजलेला रवा घाला आणि नीट हलवून घ्या. नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.


प्लेट मध्ये गार्निश करून गरमगरम सर्व्ह करा.

लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि विविध रेसिपीज साठी फॉलो करा.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Ukadpendi - उकडपेंडी

Moong Kachori - मुगाची कचोरी